१९५२ साली शंकरराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली ‘शेकाप’चे २८ आमदार निवडून येण्याचा विक्रम घडला होता. हे यश जरी शेकापला टिकवता आले नाही, तरी देखील आजतागायत रायगड जिल्ह्यातून शेतकरी कामगार पक्षाचाच आमदार सातत्याने निवडून येत आहे. आमदार गणपतराव देशमुख यांनी तर सांगोला विधानसभेतून सतत अकरा वेळा निवडून येण्याचा विक्रम केलेला आहे. पुढील २५ वर्षे तरी ‘शेकाप’ शिवाय येथे पर्याय नसणार इतकी ‘शेकाप’ने तेथे घट्ट पाय रोवलेले आहेत. समविचारी पक्षांना एकत्रित करून येणाऱ्या विधानसभेत देखील शेकपच्या आमदारांची संख्या वाढेल अशी सध्या येथे परिस्थिती आहे.
source : wikipedia
या ब्लॉगवर प्रकाशित साहित्य आणि लेखनाशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. कार्यकर्त्याकडून आणि लेखकाने दिलेल्या साहित्याची जबाबदारी ही त्यांची व्यक्तिगत आहे.
---- संपादक मंडळ ----